अक्कलकोट (क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)– कोरोनाची साखळी तोडण्या साठी दर्गा ट्रस्ट कडून मोठा निर्णय घेण्यात आला कमी होत गेलेला कोरोना पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रशासनांनी कोरोना फैलाव रोखण्यासाठी वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिनी लॉकडाऊन ची घोषणा केली आहे जो पर्यंत शासणाचे आदेश मिळत नाही तो पर्यंत भाविकांना हैद्रा येथील ख्वाजा सैपन मुलक दर्गा चे दर्शन घेता येणार नाही.
दर्शनाचे मुख्य द्वार बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती दर्गा ट्रस्टीचे व्हा चेरमन रफिक मुजावर यांनी दिली अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा सैपन मुलक दर्गा हे गेल्या मार्च महिन्या पासून बंद पाळण्यात आले होते मध्यंतरी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने त्या वेळी शासनाच्या आदेशाचे पालन करून दर्गाचे दर्शन सुरू केले होते.परंतु फेब्रुवारी महिण्यात पुन्हा कोरोना वाढत गेला आणि रुग्ण संख्येत भर पडली. हैद्रा येतील ख्वाजा सैपन मुलक दर्गाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ५ एप्रिल रोजी ८ वाजता दर्गाचे द्वार बंद करण्यात आले आहे.
दर्गाचे दर्शन घेण्यासाठी राज्य परराज्यातील भक्त हळूहळू येत आहेत. परंतु दर्गाचे दरवाजे पूर्ण पणेबंद करण्यात आले आहे. भक्तांनी हैद्रा येथे येण्याचे प्रेत्न करू नये मिनी लॉकडाऊन मध्ये मंदिर,मस्जिद बंद असणार असे निर्देश करण्यात आले आहे.शासनाच्या आदेशाचे पालन करणे योग्य आहे जो पर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही तो पर्यंत भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये घरातच सुरक्षित रहा भाविक भक्तांनी या काळात सहकार्य करावे.व दर्शन तूर्त टाकावे असे ट्रस्टीचे व्हा चेरमन रफिक मुजावर यांनी माहिती दिली आहे.






