आयकर कॉलनी मध्ये उद्यान आणि जेष्ठ नागरिकांना साठी विरंगुळा केंद्र उभारण्याची विरेंद्र म्हात्रे याची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सीबीडी परिसरातील आयकर कॉलनी हि नवी मुंबई तील एक प्रशासकीय वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक वर्षा पासून शेकडो नागरिक राहत आहेत. या वसाहती मध्ये अनेक जेष्ठ नागरिक आहेत. जे त्यांच्या मोकळ्या वेळेत बाहेर फिरताना दिसतात. यापैकी अनेक जेष्ठ नागरिक हे सरकारी नोकरी तुन निवृत्त झालेले दिसतात. या परिसरातील जेष्ठ नागरिक संघ समितीने आयकर कॉलनी , गिरीदर्शन सोसायटी सेक्टर २१, २२ येथील मोकळा भूखंड आहे त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक यासाठी विरंगुळा केन्द्र आणि उद्यान याची मागणी केलेली आहे.

navi-mumbai

कारण सायंकाळी आम्ही सर्व जेष्ठ नागरिक जेव्हा घरा बाहेर पडतो. त्यावेळी जवळ पास उद्यान नसल्याने आम्हाला लांब जावे लागते. आणि एवढे लांब जाऊन परत चालत घरी येताना आमची दमछाक होते. त्यामुळे आम्हला इथेच जवळ पास फुटपाथ वरती कधी उभे राहून प्रसंगी फुटपाथवर बसून गप्पाचा फड मांडावा लागतो. हि आमची अडचण आहे. आयकर काँलनी मधील जेष्ठ नागरिक व समाजसेवक भिमसेन तपासे यांनी या गोष्टीला दुजोरा देऊन हि गोष्ट सत्य असल्याचे सांगितले. त्याच प्रमांणे नवी मुंबईतील धडाडीचे नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी या विषयी नवी मुंबई पालिका आयुक्त व उद्यान आधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी प्रकाश गुरव, हारीषचंद्र पांडे व आयकर वसहती तील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here