शिर्डी कोविड सेंटरला विजूभाऊंची मदत

शिर्डी (प्रतिनिधी) – कोरोना पेशंट वाढत असतांना शिर्डी कोविड सेंटर हाऊस फुल्ल झालेले आहे त्यातच डॉक्टर, कर्मचारी यांची ही संख्या वाढवलेली असून आरोग्य कर्मचारी, वार्डबॅाय, नर्सेस यांना प्राथमिक वस्तूंचा तुटवडा भासत आहे अशी माहिती साईबाबा रूग्णालयाच्या पितांबरे मॅडम यांनी विजूभाऊंना दिली असतां तात्काळ विजूभाऊंनी २० बाँक्स हॅन्डग्लोज बोलावून पितांबरे मॅडम यांना पोहच केले.

याप्रसंगी उत्तमभैय्या कोते, ताराचंद कोते, भरत चांदोरे, अजय कोते , अमोल सोमवंशी, साईबाबा हॅास्पीटल कर्मचारी घनघाव साहेब उपस्थित होते. या वेळी मॅडम यांनी विजूभाऊ व आम्हा सर्वांचे आभार मानले. यावेळी विजूभाऊ व उत्तम भैय्या यांनी वेळोवेळी कुठलीही आवश्यकता असल्यास कळवावे आम्ही आमच्या परिने पूर्ण सहकार्य करू असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here