मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त नशाबंदी मंडळ बोरिवली दवाखान्यात “व्यसनमुक्ती” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे मुंबई जिल्हा संघटक सौ. दिशा कंळबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दिशा कंळबे यांनी मार्गदर्शनाची सुरूवात व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आली. तसेच व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ( दारू, गुटखा, तंबाखू, सेगरट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.
देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. असे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी बोरिवली दवाखान्यातील डॉ. निता भोसले , नागरिक सहभागी झाले. डॉ. निता भोसले यांनी उपस्थितांनाचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाने समारोप झाला.






