शिवसेना राहाता तालुकाच्यावतीने पाच लाख रुपये किंमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिवसेना राहाता तालुका यांचे वतीने पाच लाख रूपये किंमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आँक्सिजन मशीन, वाफेचे मशीन, हँन्डगाँल्ज, आँक्सिजन मास्क व ईतर साहित्य होते. यामध्ये श्री साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलला हँन्डग्लोज व वाफेचे मशीन देण्यात आले

द्वाराकामाई आश्रम यांना दहा वाफेचे मशीन देण्यात आले. ऑक्सिजन मशीन स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजू रुग्णानांना अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे व त्यामधून मिळालेली संपूर्ण रक्कम श्री साईबाबा कोवीड सेंटर साठी खर्च केली जाणार आहे. हे साहित्य घेणे साठी सरला बेटाचे मंहत रामगिरी महाराज , खा. सदाशिव लोखंडे साहेब, शिवसेना पदाधिकारी, हाँटेल मालक, साईभक्त यांनी आर्थिक सहकार्य केले आहे.

याप्रसंगी शिर्डी वि.का.स. सोसायटीचे मा.चेअरमन दिगंबर नाना गोंदकर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे अधिक्षक डाँ.प्रितम वडगांवे, डाँ. मंगेश गुजराथी, शिवसेना नेते कमलाकर कोते , तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौघुले, राहुल गोंदकर पा, महेश महाले, संतोष जाधव, अनिल पवार, नवनाथ विश्वासराव, चंद्रकांत गायकवाड , बाळासाहेब जगताप, विलास कोते पा, सुनील बाराहाते, राजेंद्र कोते पा, विश्वजित बागुल, संतोष कुर्हाडे, आदित्य कोते पा. सह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here