सोलापूर (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – महाराष्ट्रात कोरोनाचे प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असुन लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे पण महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला पूरेश्या प्रमाणात लसीचा पुरवठा करत नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे पण केंद्रातील मोदी सरकारकडून राज्याला परेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. आपल्या देशात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला लस पुरविण्याऐवजी पाकिस्तासह जगभरातील देशांना लस पुरवित आहे. राज्य सरकारकडून वारंवार मागणी करुणही लसीचा पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रुग्नसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपाशासित राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खुप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाने मोठ्या प्रमाणात रुगनांचा मृत्यु होत असताना केंद्रातील मोदी सरकार लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करुण महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे. त्यातच पंतप्रधान मोदी नी लसीकरण महोस्तव साजरा करण्याचे आवाहन केले. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद असताना लसीकरण महोस्तव साजरा कसा होऊ शकतो. कोरोनासारख्या गंभीर संकटातही राजकारणासाठी संकटाला महोस्तव म्हणून साजरा करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला ताबड़तोब लसीचा पुरवठा करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
या घंटानाद आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, हाजी नगरसेवक तौफ़ीक हत्तुरे, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, प. महाराष्ट्र सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, फ्रंटल सेलचे भारत जाधव, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तिकोंडा, नागनाथ गायकवाड़, राहुल वर्धा, विवेक कंन्ना, युवराज जाधव, आझम सैफन, हारुण शेख, दशरथ जाधव, संजय गायकवाड़, विजय शाबादे, मोनिका सरकार, एजाज बागवान, राजेन्द्र शिरकुल, सहदेव इप्पलपल्ली, राजेश झंपले, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.






