बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – खुलताबाद तालुका हा ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेला आहे हे इतिहास संशोधक आहे, आता लवकरच सुजलाम सुफलाम तालुक्यातील भ्रष्टाचाराने कळसच गाठला आहे.म्हणून तालुक्याचा इतिहास संशोधक सोनेरी अक्षराने लिहि तील.कारण सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु सिंचन,पाटबंधारे विभाग, आमदार निधी, वनविभाग, कृषी विभाग या सर्व विभागात महसूल विभाग भ्रष्टचार बोकाळला आहे.
सा.बा. उप विभाग खुलताबाद यांनी बाजार सावंगी ते इंदापूर रोड बोडखा/(गिरीजा) नदीवर लाखो ,करोडो रुपयांचा खर्च करून पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर पण पुलावरील स्लॅब(रस्ता)ला तडे गेले , याकडे कोणत्याही अभियंत्याचे, लक्ष नाही. तडा गेलेला पूल भविष्यात वाहनाची वर्दळ वाढल्याने केव्हाही ढासळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,बाजार सावंगी ते इंदापूर रोड बोडख /(गिरीजा) नदीवरील पुलाचे बांधकाम लाखो/ करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे, पण पुलाच्या छताला (रोड) तडे गेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की, हे काम निकृष्ठ दर्जाचे आहे , सदर काम हे अंदाज पत्रका प्रमाणे होत नसून माती मिश्रीत रेती , खडीच्या बारीक चुरीचा वापर केला आहे. त्यामुळे तडे गेले आहेत. त्याच प्रमाणे बाजार सावंगी ते सोबल गाव रस्त्याचे काम सिंगल लेअर मध्ये 3/4 इंच खडी वापरून त्यावर बारीक खडीच्या या रोडवर कुठल्याच प्रकारचा डांबर न वापरता बारीक फुफाट्यात काळा कलर मिश्रीत त्यावर थर दिला आहे, त्यामुळे दुचाकी वाहन चालवताना तोल सांभाळून चाल वावा लागत आहे. त्याचप्रमाणे सोबल गावातही केटी वेअरचे कामही निकृष्ठ दर्जाचे चालू असल्याचे गावकरी सांगत आहे. सदरच्या ठेकेदाराने ताजनापूर येथे दुसऱ्या संस्थेच्या नावावरचे घेऊन निकृष्ट दर्जाचे केले होते त्याची तक्रार करण्यात आली. तरीही त्याच ठेकेदाराला काम देण्यात आले. यावरून असेच दिसते की.गावकरी, प्रतिनिधी,कोमात आणि अधिकारी व ठेकेदार जोमात.






