मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनामुळे अनेक बडे कलावंत आणि अभिनेत्यांचा तसेच सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागलं आहे. यातच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली असता गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला होता.
न्याय व्यवस्थेतील कारभारावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला होता. या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले. सिनेमातील नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली होती.






