मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यासह मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरळीतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये कोरोना आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात २२५ बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपआयुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर लोकार्पणाच्या वेळी उपस्थित होते.






