मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – ” राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो, त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा “, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला होता .
यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांच्यावर टोला लगावला असून देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख मुकर्रर केली असेल त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असे टीकास्त्र सोडले.






