35 लाख लोकांचे गंगास्नान; 18,169 जणांची चाचणी, 102 काेराेना पॉझिटिव्ह

हरिद्वार – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत म्हणाले की, कुंभमेळ्यात गंगामातेच्या कृपेने कोरोना फैलावणार नाही. कुंभ आणि मरकजची तुलना चुकीची आहे. मरकजमुळे कोरोना बंद खोलीतून पसरला. कारण तेथील सर्व लोक एका बंद खोलीत होते. हरिद्वारमधील कुंभक्षेत्र नीलकंठ व देवप्रयागपर्यंत मोकळ्या वातावरणात आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी व कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. सोमवारी शाही स्नानात ३५ लाखांवर लोक सहभागी झाले. त्यापैकी १८,१६९ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here