मुंबई (संपादक सुनिल पाटील) – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार खूप जोरात सुरू आहे. सर्व प्रचार, प्रसार राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी मंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वात सुरू आहे. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी मुंबई कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांचे शंभरहून अधिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतांनी जिंकून देण्यासाठी मेहनत घेत आहेत.

भाजपाच्या विजयासाठी जागोजागी सभा घेत आहेत, लोकांना भाषणातून प्रेरित करत आहेत. जागृत करत आहेत. ते कॉर्नर सभेवर जास्त जोर देत आहेत. पार्टीचा प्रचार, प्रसार जोरात सुरू आहे. त्यांच्याबरोबर मुंबई उपाध्यक्ष आणि शंभरहून जास्त कार्यकर्ते आहेत आणि ते पार्टीला जिंकून देण्यासाठी जोरात प्रचार, प्रसार करत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीला भरघोस मतांनी जिंकून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.






