लॉकडाऊनमुळे रेल्वे स्थानकांकडे कामगारांची धाव

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागणार असल्याचे काल जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

हे निर्बंध 1 मे पर्यंत असणार असले तरी त्यात वाढ होण्याची भीती असल्याने हातावर पोट असलेले कामगार भयभीत झाले आहेत, त्यामुळे या कामगारांनी थेट रेल्वे स्थानक गाठलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली असून अचानक झालेल्या या गर्दीमुळे कामगार अधिकच भयभीत झाले असून रेल्वेने पॅनिक होऊ नका, गाड्या सुरूच राहतील. सर्वांना प्रवास करता येईल, असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे पर्यंत 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४४ कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली असून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहनही केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here