आटपाडी (प्रतिनिधी) – कोणत्याही क्षेत्रात समर्पित होऊन प्रामाणीक भावनेने केलेले कार्य प्रत्येकाला त्याच्या ध्येयापर्यत घेऊन जातेच, त्याच निरागस वृत्तीने सर्वच क्षेत्रात झगडलेल्या सादिक भाईंना त्यांचे कामच न्याय देईल . आम्हां सर्वांच्या सदिच्छा आणि ना . जयंतराव पाटील साहेबांचे आशीर्वाद भविष्यात त्यांना महत्वाच्या सत्तास्थानी नेण्यास निश्चितच उपयोगी पडतील अशा भावना खानापूर – आटपाडी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुशांत देवकर यांनी व्यक्त केल्या .
ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेंड सर्कल या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सादिक खाटीक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सुशांत देवकर आणि आनंदराव बापु पाटील यांच्या हस्ते फेटा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला . त्याप्रसंगी सुशांत देवकर बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगंगा उदयोग समुहाचे प्रणेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदराव बापू पाटील हे होते .
शासन स्तरावर आणि पक्षीय पातळीवर भक्कम स्थान असणारे ना. जयंतराव पाटील साहेबांचे नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभले आहे. खानापूर आटपाडी मतदार संघातल्या राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यानी एकजुटीने कार्य केल्यास मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा राहीलच शिवाय मतदारसंघ राष्ट्रवादीमय होवून जाईल असा विश्वासही सुशांत देवकर यांनी व्यक्त केला .
पत्रकारीतेसह विविध क्षेत्रात सादिक खाटीक यांनी केलेल्या कार्याचे कौतूक करून तालुक्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका स्तरावरील सर्वासमवेत सादिक खाटीक मोलाचे योगदान देतील अशा भावना आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदरावबापु पाटील यांनी व्यक्त केल्या .
सर्वमान्य सर्वस्पर्शी व्यक्तीमत्व असणारे सादिकभाई सर्व सामान्यापासून वरिष्टांपर्यत सर्वांनाच स्वतः होवून मदतीला धावून येतात . निष्पाप,निरागस, अभ्यासू आणि ध्येयनिष्ठ सादिक भाईंची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा सदिच्छा सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिताताई पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या .
गेली ३६ वर्षे समाजातील सर्व क्षेत्रात, गाव पातळीपासून राज्यस्तरापर्यत इमानदारीने काम करीत आलो आहे . ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी सर्वांनाच साथ देण्याचा आपला मानस असून पत्रकारीता आणि इतर क्षेत्रातही सर्वांना उपयुक्त ठरेल अशी आपली वाटचाल राहणार असल्याचा मनोदय आपल्या सत्काराला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी व्यक्त केला .
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित ऐवळे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, अनिल दिनकर बाबर, प्रविण बाबर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, भाऊसाहेब लिंगडे, दामोदर लिंगडे, पांडुरंग लेंगरे, शिवाजी लेंगरे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पुजारी यांनी केले तर आभार भाऊसाहेब लिंगडे यांनी मानले .






