राष्ट्रवादीच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांकडून सादिक खाटीक यांचा सत्कार !

आटपाडी (प्रतिनिधी) – ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेन्ड सर्कल या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रवादी युवकच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून सादिक खाटीक यांचा सत्कार करण्यात आला .

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव प्रा . एन . जी . खरजे आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस राजू जानकर या मान्यवर द्वयीनी सादिक खाटीक यांचा फेटा बांधून शाल देत सत्कार केला . यावेळी पैलवान साहील काझी विटा , सागर पाटील , स्वनील मोटे , सुखदेव खताळ, दादासाहेब मोरे विभूतवाडी हे उपस्थित होते . सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here