कोरोनाच्या काळात राजकारण नको – खा. लोखंडे

शिर्डी संस्थानच्या हॉस्पीटलचा घेतला आढावा

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – कोरोनाच्या काळात कोणीही राजकारण न करता सर्वांच्या सहकार्याने या महामारीवर आपण मात केली पाहिजे, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे सर्वांना हॉस्पीटलची गरज आहे, सर्वांनाच उपचार मिळाले पाहिजे अशी भूमीका खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडली. शिर्डीत बाहेरच्या रूग्णांना प्रवेश देऊ नये या विखेंच्या भूमीकेवर खासदार लोखंडे यांनी आपले मत मांडले. तसेच लोणीत व विळद घाटात गरीब कोरोना रूग्णांवर मोफत उपचार मिळावे यासाठी आपण खासदार सुजय विखे व आमदार राधाकृष्ण विखे यांना विनंती करणार असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले. आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रितम वडगावे, कोवीड सेंटर प्रमुख डॉ. मैथली पिंताबरे वैद्यकीय अधिक्षक डॉ. घोगरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक घेतली.

शिर्डी संस्थानकडे सध्या ७० ऑक्सीजन बेडची उपलब्धता आहे, बैठकी दरम्यान अजून १५० बेड उपलब्ध करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या. यासाठी कमी पडणाऱ्या ऑक्सीजनसाठी आपण मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही खा. लोखंडे यांनी सांगितले. तसेच कोरोना बाधीत दोन हजार रूग्णांची साई आश्रम मध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. लक्षणे दिसल्यास तात्काळ रूग्णांनी टेस्ट करण्याचे आवाहान लोखंडे यांनी केले आहे. जेणे करून आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. रेमडिसीव्हर इजेंक्शन सध्या १०० उपलब्ध करण्यात आले आहे. केंद्र सरकारने वाढती मागणी पाहून निर्यात थांबवली आहे, त्यामुळे चार ते पाच दिवसात ईंजेक्शनची उपलब्धता होणार असल्याचीही माहिती लोखंडे यांनी दिली.

संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये कोरोना रूग्णांसाठी ऑक्सीजन बेड उपलब्ध करणार असल्याने डायलिसीस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र डायलिसीस बंद केल्याने गरीब रूग्णांचे हाल होतील या पार्श्वभूमीवर डायलिसीस बंद न करण्याच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या. डायलिसीस बंद केल्यामुळे काही रूग्णांच्या नातेवाईकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती.

रेमडिसीव्हर इंजेक्शनचा काळाबाजार कोणी करत असल्यास तसेच खाजगी हॉस्पीटल मध्ये लुटमार करत असल्यास त्यावर कारवाईच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय शिंदे, शहराध्यक्ष सचिन कोते, , डॉ. एकनाथ गोंदक, काँग्रेस शहारध्यक्ष सचिन चौगुले, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, राहुल गोंदकर, संतोष जाधव, अमोल गायके, प्रसाद पाटील, विश्वजीत बागुल, नवनाथ विश्वासराव, राजेंद्र कोते, चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here