आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी म्हणजेच धारावीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव?

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात तसेच मुंबई नगरीत कोरोनाने थैमान घातला असून दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच धारावीमध्ये जर कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला तर खूप मोठा धोका उद्भवू शकतो.

“धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी”, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्याकडे केली आहे. त्यांनी लिहिल्या पत्रात असे लिहिले आहे कि, “गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय”, असं राहुल शेवाळे म्हणाले. “धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल”, असंही ते पत्रात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here