मुंबईकरांनो ! गर्दी टाळा अन्यथा परिणाम वाईट होतील

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात आता ‘ब्रेक दि चेन’ ही मोहीम लागू केली असून १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. कडक निर्बंधांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना वगळण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनावश्यक गर्दी टाळा असे आवाहन देखील राज्यातील जनतेला केले असून नागरिक सर्रासपाने नियामांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला अत्यावश्यक नावाखाली जर गर्दी करत असतील तर योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले आहेत.

त्यामुळे जर वेळीच लोकांनी गर्दी टाळली नाहीतर आणि अनावश्य गर्दी करणे थांबवले नाही तर अत्यावश्यक सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. राज्यातील अनेक शहरात लॉकडाऊन असताना सुद्धा नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here