मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यासह मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका आता ऍक्शन मोडमध्ये आली असून नागरिकांसाठी अनेक पाऊले उचलली जात आहेत. यातच दक्षिण मुंबईतील जसलोक हॉस्पिटल हे आता पूर्णपणे कोविड १९ समर्पित हॉस्पिटल केले जाणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.
याच दरम्यान, कोविड नसलेल्याना आता जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळणार नसून केवळ कोविड -१९ संक्रमित लोकांवरच उपचार होणार आहे. दरम्यान जसलोक हॉस्पिटल मध्ये २५० कोविड बेड्स वाढवले जाणार आहेत. लवकरच बीएमसीच्या ऑनलाईन डॅशबोर्डवर देखील त्याची माहिती अपडेट केली जात आहे.
यामध्ये ४० आयसीयू बेड्स हे शनिवार १७ एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्याचा मुंबई महानगर पालिकेचा प्रयत्न असणार आहे. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये आज (१५ एप्रिल ) ३० अधिक आयसीयू बेड वाढवले जाणार आहेत. तर NESCO जम्बो सेंटर मध्ये येत्या सात दिवसांमध्ये १५०० अधिक बेड्स वाढवण्यासाठी मुंबई महानगर पालिका काम करणार आहे.






