मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असताना सामान्य नागरिकांसह मोठ्या नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत असताना दिसून येत आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे खासदार आशिष शेलार हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
भाजप खासदार आशिष शेलार यांना बुधवारी करोनाची लागण झाल्याचे समोर असून अशी माहिती त्यांनी रात्री उशीरा ट्विटरद्वारे दिली. “माझी कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
I have tested positive for #Covid_19 today. I am under medication & advice all those who have been in contact with me to isolate themselves & seek medical guidance. I remain available here & via my office for hlp & assistance to Mumbaikars !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 14, 2021
यासोबतच शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.
आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत.माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) April 14, 2021






