मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. आज रितेशचे जगभरात चाहते आहेत. रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हे नेहमीच कपल गोल्स देताना दिसतात. या दोघांची जोडी चाहत्यांची आवडीची जोडी आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये ही जोडी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. रितेश-जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच एकमेकांचे मजेशीर, रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करताना दिसतात. नुकताच रितेशने सोशल मीडियावर ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाजलेल्या आगरी गाण्यावरचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. रितेशचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेकजण ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. सेलिब्रिटींपासून ते अगदी सामन्यांपर्यंत सर्वच जण या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. रितेशनेही या गाण्यावर लिप्सिंग करतानाचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलय की, ‘मी या गाण्याच्या प्रेमात पडलो आहे. ‘नारलान पाणी’ बाय धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे या दोघांना त्याने टॅग केले आहे, अशा शब्दांमध्ये त्याने हा ‘नारलान पाणी’ या गाजलेल्ला गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा हा भन्नाट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याचा हा व्हिडिओ पाहिला आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्याच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
रितेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेले हे गाणे ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे या तरुण संगीतकारांनी तयार केले आहे. हे गाणं सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे, त्यामुळे या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत या गाण्यावर सेलिब्रिटींसहीत, सामान्य लोक आणि क्रिकेटपटूंनीही ताल धरला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. रितेशच्या या व्हिडिओचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.






