राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णलयातून डिस्चार्ज

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (१५ एप्रिल) रोजी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आली असून अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली.

११ एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे.

देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. शरद पवार हे ११ एप्रिलला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि मुलगी खासदार सुप्रिया सुळे होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here