‘मुन्नी बदनाम हुई’ गाणं चक्क अभ्यासक्रमात?

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे इंग्लंडमधील संगीत अभ्यासक्रमात बॉलीवूडमधील अजून एका गाण्याचे समावेश झाले आहे.

इंग्लंडमधील डिपार्टमेंट फॉर एज्युकेशनने (डीएफई) सुरु केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमात बॉलिवूडचं ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणं समाविष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी किशोरी अमोणकर यांचे ‘सहेला रे’,अनुष्का शंकरचे ‘इंडियन समर’, ए.आर. रहमान यांचे ‘जय हो’ या भारतीय गाण्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता.

२०१०साली आलेल्या ‘दबंग’ या सिनेमातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हे हिट गाणं आहे. मलायका अरोरावर चित्रीत या गाण्यात सलमान खान तिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. तसंच या गाण्यात अभिनेता सोनू सूद देखील आहे. या गाण्यासाठी गायिका ममता शर्माला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. तर संगीतकार साजिद-वाजिद यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here