ऑक्सिजन काढून दुसऱ्याला लावल्याने शिक्षकाचा तडफडून मृत्यू

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील शिवपुरी जिल्हा रुग्णालयात एका शिक्षकाला लावलेला ऑक्सिजन काढून अन्य रुग्णाला लावल्याने संबधित शिक्षकाचा तडफडून मृत्यू झाला. संबधित शिक्षकांची प्रकृती गंभीर असतानाही रुग्णाचा ऑक्सिजन सिलिंडर हटवण्यात आला. सीसीटीव्हीत एक वॉर्डबॉय ऑक्सिजन सिलिंडर हटविताना दिसत आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सुरेंद्र शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोविड वॉर्डात दाखल झाले होते. श्वासोच्छवासात त्रास जाणवत असल्याने त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता.

मंगळवारी (ता. १३ ) रोजी रात्री त्यांचा मुलगा दीपक याने रात्री ११ वाजता फोनवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. ते जेवतही होते. मात्र, दुसऱ्या दिवशी तो रुग्णालयात गेल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन काढल्याचे लक्षात आले.

दीपकच्या म्हणण्यानुसार, वडिलांची तब्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुधारत होती. रात्री कुणीतरी अचानक त्यांचा ऑक्सिजन हटवला. त्यानंतर ते तडफडत राहिले. सकाळी मला फोन आल्यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टर आणि नर्सेसना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले. १०-१५ मिनिटांनी वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रुग्णालयानं सीटीव्ही फुटेज तपासले असता एक वॉर्डबॉय शर्मा यांचा ऑक्सिजन सिलिंडर हटविताना दिसत आहे. यासाठी एक गार्डही त्याच्या मदतीला उभा असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here