साराने दिले महिला फॅन्सला सडेतोड उत्तर…

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – क्रिकेटचा देव अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांना स्वत:बद्दलची माहिती देत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवलेल्या एका फोटोवरुन एका महिला फॅन्सने तिला डिवचलं असता साराकडून तिला चांगलेच उत्तर देण्यात आले आहे.

sara-tweet
१६ एप्रिलला सारा तेंडुलकरने गाडीत कॉफी पीत असल्याचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला असून ब्लू टोकाई कॉफी, आयुष्याला वाचवते, असं म्हणत साराने तो फोटो इंस्टग्रामवर शेअर केला. तिच्या फोटोवर नेहमीप्रमाणेच कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झाला. मात्र, एका महिला फॅन्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असून बापाचा पैसा उडवतेस, अशी एक कमेंट तिच्या महिला फॅन्सने तिच्या फोटोवर केली. त्यावर साराने तिला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “कॅफीनवर खर्च झालेला पैसा तो वायपट नाही तर त्याचा योग्य वापर आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here