पेट परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी घेतलेल्या ऑनलाईन पेट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या लिंकवरून परीक्षा दिली होती त्याच लिंकवर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. परीक्षेच्यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक, युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठाने मार्चमध्ये विविध विषयांसाठी पेट परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. यामध्ये पीएचडीसाठी एकूण 7 हजार 706 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 4 हजार 304 विद्यार्थी पास झाले आहेत. तर एमफील परीक्षेला बसलेल्या 223 विद्यार्थ्यांपैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पीएचडी निकालाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 55.85 एवढी असून एमफील परीक्षेची टक्केवारी 47.53 एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here