जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील जुन्या रजिस्टर ऑफिस जवळ प्रजापिता ईश्वरीय विद्यालय हे अनेक वर्षां पासून सुरू होते धरणगाव शहरात तसे दोन केंद्र आहेत एक एरंडोल रस्त्याला ते विद्यालय आहे व संजीवनी दीदीचे मार्गदर्शन केंद्र होते दोघांना माउंट आबू (राजस्थान) मान्यता होती.
संजीवनी दिदी यांच्या मार्गदर्शन केंद्र अनेक ज्येष्ठ नागरिक,महिला, विद्यार्थी ज्ञान संपादक करण्यासाठी येत होत्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत मधून हे केंद्र संजीवनी दिदी चालवत होत्या त्या अविवाहित होत्या. आपले घरदार,नातेवाईक सोडून त्यांनी विद्यालयाला समर्पित केले होते शहरातील व परिसरातील शेकडो नागरिकांना त्यांनी माउंट आबू येथील केंद्रात भेट देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी नेले होते.
आठ दिवसापूर्वी कोरोनामुळे त्यांची तब्येत बिघडली व त्या जळगाव येथील दत्त हॉस्पिटला अॅडमिट झाल्यात त्यांच्या सिटी स्कॅन स्कोर फक्त 4 म्हणजे नॉर्मल होता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची बहिण नंदुरबार येथे सिस्टर होत्या त्यांनी हॉस्पिटलचे इंचार्ज बडगुजर यांना सांगितले की नंदुरबारला चांगले लक्ष ठेवेल तुम्ही दीदींना शिफ्ट करा.
नाशिक येथून भरत भाई असर यांचा पी एम पाटील यांना फोन आला दीदी ॲडमिट आहे त्यांना रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकता आहे बडगुजर यांच्याशी पी.एम.पाटील यांनी चर्चा केली व लागलीच पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोन वरून माहिती सांगितली व आपण व्यवस्था करू काही काळजी करू नका असे सांगितले.
थोड्या वेळाने हॉस्पिटलमधून फोन आला नंदुरबारच्या त्यांच्या सिस्टर यांनी तात्काळ नंदुरबारला माझ्या बहिणीला पाठवा मी याठिकाणी त्यांच्यावर लक्ष ठेवून चांगला उपचार करेल त्यांना तात्काळ ॲम्बुलन्सने नंदुरबार पाठविण्यात आले.नंदुरबार १०ते१२किमी अंतर असतांना सिलेंडर संपला.त्यांच्या बहिणीला कळताच त्यांनी नंदुरबार होऊन तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला परंतु नंदुरबार पोचण्याआधीच त्यांच्यावर कोरोनाने झडप घातली आणि त्यांची प्राणज्योत मलवली. नंदुरबारपर्यंत त्या पोहचल्या असत्या तर त्यांचे प्राण वाचले असते परंतु नशीबानेसुद्धा असा क्रूर डाव केला आणि त्यांचा प्राण गेला सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.






