बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – बाजार सावंगीत व परिसरात सध्या बहुतांश भागांमध्ये बंगाली बाबू मुन्नाभाई सहबोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू बाजार संगीत आत्ताच्या घडीला पाच ते सहा मुन्नाभाई सह दोन बंगाली बाबूंचा दवाखाना थाटलाआहे आठवणीतील बाजार सावंगी येथील व परिसरातील लोकांची दिशाभूल करत मुळव्याधीचे एका ऑपरेशनचे हा बंगाली बाबू वीस ते पंचवीस हजार रुपये ची रुग्णाकडून आर्थिक लूट करीत आहे
या बंगाली डॉक्टरकडे कुठल्याही प्रकारची डिग्री अथवा पदवी नसतानाही हा बिनधास्तपणे मुळव्याधचे ऑपरेशन च्या नावाखाली लोकाकडून आर्थिक लूट करत रुग्णांच्या जीवाशी खेळतआहे व यात काही 5/6 मुन्नाभाई बोगस डॉक्टरांचा समावेश आहे यांच्याकडे ही कुठल्याही प्रकारची डिग्री अथवा पदवी नसताना हे देखील बिनधास्तपणे रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे यांच्यावरील कारवाई येणाऱ्या कायदेशीर बाबतीत अडचणी आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेते लोकप्रतिनिधी यांचे व बोगस डॉक्टरांचे असलेले लागेबांधे व आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याने आणि कार्यवाही हस्तक्षेप अशा बर्याच कारणांमुळे बंगाली बाबू सर्व डॉक्टरांचे भलतेच पावले आहेत
आत्ताच्या घडीला तरी या बोगस डॉक्टरांची चांदी चांदी होत आहे आरोग्य विभागाची.उघडपणे हातमिळवणी छुपी युती असल्याने तेरी भी चूप मेरी भी चुप अशी गत झाली आहे बंगाली बाबू सह मुन्नाभाई यांचे बोगस दवाखाने बाजार सावंगी व परिसरात बिनधास्तपणे जोमात सुरू आहे ग्रामीण भागातील डॉक्टरांनी तर दवाखान्याचे फलकही लावलेलेआहे बंगाली बाबू व मुन्नाभाई सह मागील वर्षभरात बोगस डॉक्टर झालेल्या कारवाईच्या डॉक्टरची संख्या सातत्याने वाढत आहे सामान्यांचा अज्ञानाचा फायदा घेणारे यातील अनेक डॉक्टरांनी आरोग्याशी होणारा हा जीवघेणा खेळ थांबता थांबत नाही असे दिसून येत आहे की आरोग्य विभाग या बोगस डॉक्टर कडे डोळेझाक करणे मुद्दामहून आर्थिक देवाण-घेवाण करीत त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही आरोग्य विभाग यामुळेच हे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे या बोगस डॉक्टरामुळे आतापर्यंत कित्येक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहेत तरी देखील आरोग्यमंत्री आरोग्य विभाग तालुकाअधिकारी हे अजूनही झोपेचे सोंग घेत आहे
या बोगस डॉक्टरांविरुद्ध शासन निर्णय असून सुद्धा खुलताबाद तालुक्याचे आरोग्य अधिकारी शिंदे कुठलीच कारवाई करीत नाही महाराष्ट्र मेडिकल रेक्टिफिकेशन कायदा कलम 33 आणि 36 अंतर्गत ह्या बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे व 36 कलमांतर्गत डॉक्टर ही पदवी नावापुढे वापरत असल्यास एक ते तीन वर्ष सजा. दंड आकारला जातो डॉक्टर असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी कलम 439 420 अंतर्गत 7 वर्ष शिक्षा होते आपल्याला डॉक्टर विषयी संशय वाटल्यास आपण ग्रामपंचायत अथवा पोलीस स्टेशन पोलीस चौकी यांच्याकडे तक्रार देऊन शकतो आरोग्य विभागाने आता प्रत्येक गावात गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहेत या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर मेडिकल ऑफिसर यांच्या नियुक्त्या ही केलेल्या आहे तरीसुद्धा तालुका आरोग्य अधिकारी शिंदे साहेब मेडिकल ऑफिसर बोगस डॉक्टरावर कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे खुलताबाद चे आरोग्य अधीक्षक शिंदे यांना हत्या काठी लाखो रुपये मिळत असल्याने हे अधिकारी चुप्पी साधून बसल्याचे दिसून येत आहे अशी चर्चा सध्या खुलताबाद शहर व बाजार सावंगी परिसरातील नागरिकांतून होत आहे






