बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – प्रशासनाकडून कोविड १९तथा कोरोना चे वाढते प्रादुर्भाव बघता जिल्हा अधिकारी यांनी सकाळी ७ ते दुपारी १वाजे पर्यंत जीवनावश्यक वस्तू प्रतिष्ठाने व २४ तास औषधी दुकाने उघडे ठेवण्याचे आदेश निर्गमित केल्यावर बाजार सावंगीत काटेकोरपणे अंमलबजावणी आज होताना दिसली.

गाव तथा रेणुका माता परिसर, मुख्य बाजारपेठ, सावंगी – जैतखेडा रोड मार्केट, नवीन मार्केट, शेरोडी- ताजनापूर फाटा नवीन मार्केट, ते जि. प. शाळा ते दवाखाना काॅलनी पर्यंत चे मार्केट आज कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.






