फलटण शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत आज १७:३० ते १८:२० वाजण्याच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण या ठिकाणी फलटण नगर नगरपरिषद फलटण व फलटण शहर पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या नाविन्यपूर्ण उपक्रम शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली होती.

यावेळी एकूण ५० लोकांची रॅपिड टेस्ट केली त्यामध्ये एकूण ५ लोक पॉझिटिव्ह मिळून आले सदर पॉझिटिव्ह मिळून आलेल्या नागरिकांना कोरंनटाईन केंद्रात भरती करण्यात आले आहे. तसेच IPC १८८ प्रमाणे २ गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच इथून पुढे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरीकांची रॅपिड टेस्ट केली जाणार आहे तरी कोणीही विनाकारण अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरण्याचे बंद करावे असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण नगर परिषद फलटण यांचे वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here