सोलापूर (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरिता रविवार, दि. १८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत सोलापूरातील यंत्रमाग कामगारांकरिता सोलापूर यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर येथे मोफत अँटीजेन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सोलापूरातील सर्व यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील सर्व कामगारांचे कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट करून घेतले. यामुळे सदर कामगारांना यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. या शिबीरामुळे सोलापूरातील शेकडो गोर-गरीब यंत्रमाग कामगारांना अत्यंत मोलाची मदत झाली असल्याने अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आधार मानले.

यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. धनराज पांडे, सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे श्रीधर बोल्ली, निलेश फोफलिया, रमेश ढाकलिया, सुधाकर गुंडेली, अमर देवसानी, विकास गड्डम, सुरेश नक्का, लक्ष्मीनारायण दासरी, लक्ष्मीकांत साका, नागेश बोमड्याल, तिरुपती परकीपंडला, ओंकार अडगटला, सन्नी मडूर, विजयकुमार हलकट्टी, सिध्दू अल्ली, अशोक वडनाल, भूषण येलें, राजय्या गज्जम, आदि. बहुसंख्य कारखानदार व कामगार उपस्थित होते.






