कोरोनाने नायब तहसीलदारांचा मृत्यू

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नायब तहसीलदार अशोक सलामे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. अशोक सलामे (वय ५४) हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरोरा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते.

वरोरा तालुक्यात कोरोनाचा सध्या झपाट्याने प्रसार होत असून तालुक्यात जनता कर्फ्यू सुरू आहे. याच दरम्यान येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अशातच नायब तहसिलदार अशोक सलामे हे सुद्धा कोरोनाग्रस्त झाले होते.

यानंतर त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (दि.१८) रोजी कोरोनाने मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here