मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. राम नाईक यांनी स्वत:ला गोरंगाव पूर्व, गोकुळधाम येथील लक्षचंडी सोसायटीमधील त्यांच्या घरीच विलगीकरण केले आहे.
राम नाईक यांना थोडा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
दरम्यान, मालाड पूर्व संजीवनी रुग्णालयाचे डॉ. सुनिल अग्रवाल व डॉ. राजेश बिनयाला यांच्या देखरेखीखाली राम नाईक यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारत आहे.






