अभिनेत्री रेणुका शहाणेला कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सोनू सूद, अर्जुन रामपाल, आशुतोष राणा यासारखे कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर आता आशुतोष राणा यांची पत्नी आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतकचं नाही तर त्यांच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रेणुका यांनी आठवड्यापूर्वी कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला होता.

रेणुका शहाणे आणि त्याची दोन मुले शौर्यमान आणि सत्येंद्र यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वजण घरामध्ये आयसोलेट झाले आहेत. कोरोना नियमावलीचे पालनही करत आहेत.

आशुतोष राणा यांनी आपली पत्नी रेणुका शहाणेसोबत ६ एप्रिलला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. १४ एप्रिललाआशुतोषयांना कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती स्वत: आशुतोष राणा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here