नाशिकच्या रुग्णालयातून महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांचं मंगळसूत्र लंपास

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील नामांकित रुग्णालयात उघड झाला आहे. मयत महिला रुग्णाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला गेले आहेत.

नाशिक शहरातील स्पंदन हॉस्पिटलविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी शिंदे ही महिला स्पंदन रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कल्याणी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याचा आरोप मुलाने केला आहे.

कल्याणी शिंदे यांचे तब्बल अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र हॉस्पिटलच्या स्टाफने चोरल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांकडून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र खाजगी रुग्णालयावर झालेल्या या आरोपांमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here