नवापुर तालुक्यातील सोनपाडा गावात चक्रीवादळाचे थैमान

घरांचे छत 25-30 फूट हवेत उडाले, भिंती कोसळल्या; सहा कुटुंब उघड्यावर

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनपाडा गावात चार वाजेच्या सुमारास एका चक्रीवादळाने सहा घरांची छते उडवली. या घटनेत त्या घरांचे मोठे नुकसान झाले. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील सोनपाडा येथे दुपारी एक चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळामुळे परिसरातील घरांची छत, पत्रे तब्बल 25 ते 30 फूट हवेत उडाले. तसेच, सिमेंटच्या भिंतीदेखील कोसळून पडल्या.

या चक्रीवादळात आदिवासी समाजातील ग्रामस्थांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here