जिल्ह्यासाठी विखे परिवाराने दिले मोफत तीनशे रेमडिसिव्हर इंजेक्शन

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील साई सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल मधील रुग्णांसाठी शंभर रेमडिसिव्हीर इंजक्शन उपलब्ध करून दिले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे या शंभर इंजेक्शन्सचे किट सुपूर्त करून ज्या रुग्णांना याची तातडीने गरज आहे त्यांना देण्यात यावे अशी सूचना विखे यांनी केली.

दिवसेंदिवस फोफावत चालणाऱ्या या कोरोनाला लवकरात लवकर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी मदत सर्वांनी करूया असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर , प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर , विलास कोते, नगरसेवक दत्तू कोते, उपनगराध्यक्ष सचिन कोते, अभय शेळके, सुजीत गोंदकर, भाजपचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक अशोक गायके, तुषार शेळके, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here