गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग; अंत्यविधीसाठीही रांगा?

वलसाड (गुजरात) – राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज वलसाडच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पीटलमधील घटनेवरुन लावला जाऊ शकतो. या हॉस्पीटलच्या कोरोना वार्डातून एका पाठोपाठ एक मृतदेह येतच आहेत. पोस्टमॉर्टम रुममध्येही मृतदेह तसेच पडून आहेत. जिल्ह्यात अचानक वाढलेल्या मृत्यूंमुळे डेथ सर्टिफिकेट तयार करायलाही तासनतास लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की,अनेक मृतदेहांवर मागील तीन दिवसांपासून अंत्यविधी करण्यात आलेला नाही. त्यांना तसेच ठेवल्यामुळे त्यांच्यातून आता वास येऊ लागला आहे.

सिव्हिल हॉस्पीटलचे सुपरिटेंडेंट अमित शह यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांसाठी या ठिकाणी 400 बेडची सुविधा आहे. पण, अनेक जण परिस्थी गंभीर झाल्यानंतर हॉस्पीटलमध्ये भरती होत आहेत. अशावेळी त्यांना ऑक्सीजन किंवा व्हेटिलेटरची गरज भासत आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे आमचे कामही वाढले आहे. कोव्हिड वार्डातून पोस्ट मॉर्टम रुमपर्यंत मृतदेहांना नेण्यासाठी बाहेरून लोक बोलवावे लागत आहेत.

वलसाड सिव्हिल हॉस्पीटलबाहेर मृतांचे नातेवाईक अनेक तासांपासून मृतदेहाची वाट पाहत आहेत. यातील काहीजण 36 तासांपासून अंत्यदर्शनाची आस लावून बसले आहेत. हॉस्पीटलच्या गलथान कारभारामुळे लोकांमध्येही नाराजी वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here