बुलडाणा (प्रतिनिधी) – भाजप आमदार संजय कुटे यांच्या ताफ्यावर शिवसेना बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला चढवला आहे. आमदार कुटे यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.
कुटे म्हणाले, “माझ्या वाहनावर बुलढाणा येथे संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. आता मी गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलढाणा शहर सोडणार नाही.”, असा इशारा त्यांनी दिला होता.
“मी परत बुलढाणा शहरात येतोय हिम्मत असेल मला अडवून दाखवावे, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर गायकवाड किती खालच्या पातळीवर टीका करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. गायकवाड किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकतात याचे प्रमाण त्यांनी दिले आहे. जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.






