‘जेईई-मेन’ परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता यूजीसी-नेट पुढे ढकलण्याची मागणी

नवी दिल्ली – वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट-पीजी’ आणि इंजिनीयरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘जेईई-मेन’ परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता यूजीसी-नेट परीक्षेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने यूजीसी-नेट पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.

यूजीसी-नेट परीक्षा 2 मे रोजी घेण्यात येणार आहे. ती पुढे ढकलली गेली नाही तर परीक्षेची प्रवेशपत्रे काही दिवसांतच विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहेत. या परीक्षेचे दोन पेपर असून त्यातील प्रश्नांना पर्यायी उत्तरे देण्यात येणार आहेत. दोन पेपर सलग एकापाठोपाठ घेतले जाणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधकाच्या फेलोशिपसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

यूजीसी-नेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. 2020मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जून 2020मध्ये होणारी यूजीसी-नेट सप्टेंबरपर्यंत आणि नंतर पुन्हा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली होती. त्यानंतर डिसेंबरमध्येही ती परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे ती येत्या मेमध्ये घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here