कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राहुल गांधी यांनी स्वत:च ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. राहुल गांधींना कोविड-१९ची सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीमध्ये राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना संदर्भातील सुरक्षेच्या आणि काळजी घेण्याच्या नियमांचे पालन करावे असे सांगितले आहे.

आपल्या कोरोना संसर्गाविषयी राहुल गांधी थोड्या वेळापूर्वीच ट्विट करत माहिती दिली आहे. कोविड-१९च्या सौम्य लक्षणांनंतर मी कोरोनाची चाचणी केली. नुकताच माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अलीकडच्या काळात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या असतील त्यांनी कोविड-१९संदर्भात प्रोटोकॉलचा अवलंब करावा आणि सुरक्षित राहावे, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाशी निगडीत खबरदारी घेत सुरक्षित राहावे असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कालच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

याआधी राहुल गांधी यांनी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण केल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व प्रचार सभ रद्द करत असल्याचीदेखील घोषणा केली होती. देशातील कोरोना संसर्ग झालेल्या महत्त्वाच्या लोकांमध्ये आता राहुल गांधी यांचादेखील समावेश झाला आहे. कालच देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते एम्समध्ये दाखल झाल्याचे वृत्त समोर आले होते.

राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने राहल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. तुम्हाला आरोग्य लाभो आसाठी ईश्वराकडे प्रार्थना या आशयाच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here