नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. करोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
पत्नी सुनिता करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत. तर त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल देखील होम क्वारंटाईन झाल्या आहेत.
याआधी जूनमध्ये अरविंद केजरीवाल यांना करोनाची लक्षणे दिसून आली होती. मात्र त्यावेळी त्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली होती. सध्या केजरीवाल दिल्लीतील करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.






