शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात; नवाब मलिक यांचं ट्वीट

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

शरद पवार यांना काल रात्री पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी मागील महिन्यात पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्तशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, काल पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here