पनवेलमधील वृद्धाश्रमात एकाच वेळी ५८ जणांचा कोरोनाची लागण

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – महाराष्ट्रातून दिवसागणिक समोर येणारी कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. शिवाय राज्यातून अशा काही घटना समोर येतात ज्या चिंता वाढवणाऱ्या ठरत आहेत. अशीच एक घटना पनवेल याठिकाणी असणाऱ्या वृद्धाश्रमात घडली आहे. मुंबईच्या जवळच असणाऱ्या पनवेलमध्ये परम शांतीधाम नावाचा वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमामध्ये एकूण 58 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण कशामुळे झाली, योग्य खबरदारी घेतली गेली नाही का? असे विविध सवाल या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत.

पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे की, ‘याठिकाणी 58 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 16 जणांना ऑक्सिजनची गरज होती असल्याने त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वृद्धाश्रमात आयसोलेट करण्यात आलेल्या व्यक्तींचे परीक्षण केले जात आहे.’

रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये कोरोनाची आकडेवारी सर्वाधिक आहे. याठिकाणी दररोज 400 ते 500 नव्या रुग्णांची नोंद होत असते. अशावेळी वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी अशाप्रकारे हलगर्जीपणा होणं, अतिशय धोकादायक आहे. हा वृद्धाश्रम ब्लॉक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here