भायखळा जेलमध्ये इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैदी कोरोनाबाधित

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक समोर येत आहे. यासोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं चित्र आहे. कोरोनानं आता तुरुंगातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

भायखळा तुरुंगातही आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचं समोर आलं आहे. या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं आहे. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे, तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात 10 दिवसांपूर्वी एकाच वेळी 28 कोरोना रुग्ण आढळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here