डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्याच्या तणावातून महिला डॉक्टरची आत्महत्या

sucide
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असल्याने तणावात राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिला डॉक्टरने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कांचनवाडी परिसरात मंगळवारी सकाळी आठला ही घटना उघडकीस आली. डॉ. प्रियंका क्षीरसागर (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे पती डॉ. प्रमोद क्षीरसागर घाटीत (एम.डी. मेडिसीन) डॉक्टर आहेत.

कांचनवाडी परिसरातील ग्रँड कल्याण सोसायटीत क्षीरसागर कुटुंब राहते. प्रियांका यांनी गळफास घेतल्याचे सकाळी समजल्यानंतर डॉ. प्रमोद यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारांसाठी घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त केली असून त्यात त्यांनी, ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार ठरवू नये’, असा उल्लेख केला असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रियंका या नगर जिल्ह्यातील असून प्रमोद यांच्याशी त्यांचा साडेचार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपासाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here