वेलिंग्टन- कार्यालयातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या एका केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली आहे. इमिग्रेशन मंत्री लीस-गैलोवे यांचे एका महिलेसोबत गेल्या एक वर्षापासून संबंध होते. ही महिला गैलोवे यांच्या अखत्यारित असलेल्या एका एजेंसीमध्ये काम करत होती, अशी माहिती जेसिंडा यांनी दिली आहे.
लिबरल लेबर पक्षाच्या प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितलं की, मंगळवारी उशीरा त्यांना लीस-गैलोव यांच्यावर झालेल्या आरोपांची माहिती मिळाली. त्यानंतर गैलोव यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तराने मला कळाले की ते आता मंत्रिपदी राहण्यास लायक नाहीत. त्यांनी केलेल्या कृतीमुळे मला त्यांना मंत्रिपदापासून हटवावे लागले. संसदेत अशा प्रकारचे वागणे यापूर्वी चालले असेल, पण यापुढे अशाप्रकारची कृती सहन केले जाणार नाही.







