आजपासून ३१ जुलैपर्यंत पाहू शकता ‘हे’ चित्रपट

मुंबई (जॉनी वाझ) – कोरोनाचे थैमान अख्ख्या जगात पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्व सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट रिलीज करण्यास डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. जुलै महिन्यात काही महत्त्वाचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. तुम्ही २४ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत तुम्ही पुढील चित्रपट पाहू शकता.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केले आहे.
तिग्मांशू धुलियाचा ‘यारा’ हा चित्रपट ३० जुलै रोजी रिलीज होणार असून तो झी ५ वर रिलीज होणार आहे. यामध्ये विजय वर्मा, विद्युत जामवाल, अमित साध आणि केनी डी हे चार कलाकार भूमिका साकारत आहेत. ४ मित्रांची भूमिका असलेल्या या चित्रपटात श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बहुचर्चित चित्रपट शकुंतला देवी ॲमेझॉन प्राईमवर ३१ जुलै रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनू मेनन यांनी केले असून यामध्ये विद्या बालनची प्रमुख भूमिका आहे. शकुंतला देवी या गणिततज्ज्ञांची व्यक्तीरेखा विद्या साकारतेय.
नेटफ्लिक्सवर ‘रात अकेली है’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहन यांनी केले आहे. राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका यामध्ये आहे. त्याचबरोबर, श्वेता त्रिपाठी, इला अरुण, खालिद तैय्यबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशु धूलिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये दिसणार आहेत.
कुणाल खेमुचा लुटकेस हा चित्रपट ३१ जुलै रोजी डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा कॉमेडी ड्रामा असून दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. यामध्ये रसिका दुग्गल, विजय राज, रणवीर शौरी, गजराज राव यांच्याही भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here