अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार करणाऱ्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी

जळगाव (निलेश पाटील) – रविवारी तांबापुर येथील अल्पवयीन मुलीचा मृर्त्यदेह संशयास्पदरित्या मिळाल्याने सर्वदूर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही मुलगी कामावर गेल्यानंतर परत घरी न आल्याबद्दल पालकांनी रामानंदनगर पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंद केला व त्या मुलीचे डेड बॉडी सोमवारी सकाळी मेहरून तलाव येथे संशयास्पद मिळून आल्याने सदर मुलीवर अपहरण केलेल्याने अन्याय अत्याचार केला असावा व जीवानिशी मारले असावे याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देऊन आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे तसेच जळगावात मागील तीन-चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना अल्पवयीन मुलीसोबत घडल्या असून त्या प्रकरणातसुद्धा पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी म्हणून पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी समितीतर्फे करीत आहे. अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार विरोधी समिती जिल्हाध्यक्ष डॉ शरीफ बागवान जळगाव यांच्या मार्गदशनाखाली जळगाव महानगर अध्यक्ष रफीक सलीम यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी राऊत यांनीसुध्दा या प्रकरणात तपास करण्याचे तसेच आरोपीवर कठोर कारवाई होईल या हिशोबाने दोषारोपण तयार करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ शरीफ बागवान जळगाव महानगर अध्यक्ष रफीक सलीम अ,अ.भ,वि समिती जळगाव, सरफराज मोमीन सदस्य, सईद हुसैन रफीक हुसैन खजिनदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here