ठाणे – कळवा रुग्णालयात कोरोना उपचाराकरिता दाखल असलेल्या दोन रुग्णांनी पलायन केल्याची घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. मागील पाच दिवसांपासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रूग्ण हा भिवंडी येथे राहणारा आहे. तर दुसरा रूग्ण नवी मुंबई मधील कोपरखैरणे येथे राहतो. या दोघांना कोरोनाची लक्षणे असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याने इतर रुग्णालयात त्यांना हलविण्यात येणार होते. त्याची तयारी सुरू असताना अस्वस्थ वाटत असल्याचा बहाणा करून भिवंडी येथील रुग्णाने पलायन केले तर दुसरा रूग्ण संधी साधून रुग्णालयातून निसटला.
याबाबत रुग्णालय प्रशासनाने भिवंडी पोलिसांकडे तक्रार दाखल केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील कळवण्यात आले आहे. कळवा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रुग्णालयातील सुमारे ५२ कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली होती. येथे परिचारिका देखील कमी आहेत. रुग्णालयावर ताण पडला आहे. त्यातून अशा गोष्टी घडत असल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. तर दोन रूग्ण पळून गेल्याच्या घटनेला रुग्णालयाच्या डीन यांनी देखील दुजोरा दिला आहे.







